Share

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर केला. मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केलाय. देशाच्या शूर सैनिकांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शाह यांच्या जे बोलले ते उसणं आवसान आणून, खोट बोल पण रेटून बोल, असं मुख्यमंत्र्यांच रुप पाहायला मिळालं. अस फडणवीस म्हणाले आहेत.

तर, शरजील उस्मानीच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते भाजपला हिंदुत्व शिकवत आहेत. असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे चौकातलं भाषण होतं. कोरोना संदर्भातील विरोधकांच्या मुद्याला ते उत्तर ते देऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं महाराष्ट्राची निराशा केली. अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, सीमेवर बंदोबस्त केला असता तर चीन घुसला नसता. मात्र, शेतकरी देशाच्या राजधानीत येऊ नये म्हणून खिळे लावले जातात. हा देश शेतकऱ्यांचा आहे. भारतमाता की जय म्हणलं म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही. अस मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!