मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. हे अधिवेशन केवळ १० दिवसाचं केल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. ‘पक्षाचे कार्यक्रम, सभा, अभियान, सत्कार यावेळी कोरोना नसतो. मात्र अधिवेशन आलं की कोरोना वाढतो’ अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली होती.
भाजपच्या आरोपांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार, कोव्हीड योद्धे हे प्रयत्न करत आहेत. कोरोना पासून सावध राहायला हवं,’ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी आज विधानसभेतील भाषणावेळी केलं आहे.
‘कोरोनाला व्यक्तींमधील फरक समजत नाही. कोण मंत्री, कोण आमदार, कोण सत्तेतील, कोण विरोधी, कोरोना कोणालाच ओळखत नाही. त्याची थट्टा करू नका. गेल्या काळात सामान्य नागरिकांसह विविध पक्षातील नेत्यांसह मंत्र्यांना देखील कोरोना झाला होता. अनेकांना जीव गमवावा लागला आहे,’ असं भाष्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला !
‘राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय. कोरोना व्हायरस म्हणतोय, “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” ‘ असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ‘राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा अधिक आहे, कारण त्यात कोणतीही लपवाछपवी नाही. सर्व रुग्णांचे आकडे हे पारदर्शक आहे. मी आयुष्यात कधीच खोटं बोललेलो नाही,’ असं स्पष्टीकरण देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसल्यावर पळे’
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही’
- ‘आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?’
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

