Share

घोटाळा झाला आहे, अधिकाऱ्यांचे निलंबन ; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नागपूर येथील समता प्रतिष्ठानच्या मार्फत आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघड झाले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी कॅगकडे यासंदर्भातील काही माहिती जाणीवपूर्वक लपवल्याचेही स्पष्ट झाले. त्यानुसार समता प्रतिष्ठानच्या या आर्थिक गैव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत केली.

समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत धनंजय मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी धनजंय मुंडे यांना कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला आहे. तर, या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं उघडं करा व त्यांच्यावर आजच्या आज कारवाई करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उचलून धरली होती.

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आहेत. तसंच, भ्रष्टाचार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या संस्थांतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याची घोषणाही मुंडे यांनी केली आहे.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना आमदार सुनील प्रभू, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रसे आमदार नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी समता प्रतिष्ठानच्या घोटाळ्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मुंडे यांनी ही घोषणा केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!