🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांपासून बेरोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा काँग्रेसने वेळोवेळी करत सरकारला याबाबत सावध केलं आहे. मात्र, स्टार्टअप्स उभारून इतरांना रोजगार निर्माण करून देता येईल यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जात आहेत. मेक इन इंडिया सारखे अभियान देखील सुरु करण्यात आले.
परंतु, देशातील बेरोजगारी झपाट्याने वाढत असतानाच त्यात कोरोनाची भर पडली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारने २०१६ मध्ये केलेल्या नोटबंदीचे विपरीत परिणाम देशातील आर्थिक डबघाईच्या स्थितीला कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
‘भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतल्या गेलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तसंच असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नाही,’ असं सांगत त्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाच्या उदघाटनावेळी हे भाष्य केलं आहे.
‘सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो’ अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे, ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही,’ अशी खंत देखील डॉ. मनमोहन सिंग यांनी बोलून दाखवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकली नाही
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात, एखाद्या राज्यमंत्र्यांसारखं वागू नका’
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
