Share

धक्कादायक! अनाथ बालकाआश्रमातील अधीक्षकानेच केला अत्यचार

Published On: 

नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात माणुसकीच्या नावाखाली काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुदखेड येथील आस्था अनाथ बालकाश्रमातील अनाथ मुलींवर सतत अत्याचार करण्यात आला. महत्वाचे म्हणजे हा अत्याचार अनाथ बालकाश्रमातील अधीक्षकानेच केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुदखेड तालुक्यात एका खासगी संस्थेच्या माध्यमातून आस्था अनाथ बालकाश्रम हा कार्यरत आहे. या आश्रमात वय वर्षे दोन ते सतरा वर्षापर्यंतचे मुले व मुली वास्तव्यास करतात. शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी या आश्रमातून मध्यरात्री दोन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. याची तक्रार आश्रमाच्या अधीक्षकानी पोलिस ठाण्यात दिली. दिलेल्या तक्रारीनूसार दोन्ही मुली मुदखेड येथून कृष्णा एक्स्प्रेस या रेल्वेने किनवटला गेल्या.

किनवट पोलिसांनी रेल्वे स्थानकावर चौकशी केल्यावर त्या मुदखेड येथील अनाथ बालकाश्रमातील असल्याचे समजले. यानंतर मुदखेड पोलिसांनी किनवट येथे जाऊन त्या दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. मात्र, संबंधित मुलींनी अनाथाश्रमात जाण्यास नकार दिला. अधीक चौकशी केली असता आश्रमाचे अधीक्षक मुलींवर अत्याचार करत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मुदखेड पोलिसांनी आश्रमाच्या अधीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करत रविवारी आरोपीस अटक केली. संबंधित आरोपीस त्यानंतर मुदखेड पोलिसांनी नांदेड येथील न्यायालयापुढे हजर केले, अशी माहिती मुदखेडचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!