औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी २५६ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शहरात २०४ आणि ग्रामीण भागात ५२ नवे बाधित रुग्ण आढळून आले, दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या ५० हजार ३६६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४६ हजार ९९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १ हजार २६८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रविवारी मनपा हद्दीतील ५१ आणि ग्रामीणमधील २० अशा एकूण ७१ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी घाटीत तिसगाव येथील ६६ वर्षीय वृद्धाचा आणि संभाजी कॉलनीतील ३२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विनामास्क नागरिक
मनपाच्या २४ पथकांनी शनिवारी दिवसभरात फक्त ९१ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला. तसेच रस्त्यांवर थुंकणाऱ्या ७० जणांना प्रत्येकी १०० रुपये दंड केला. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरातील अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक विनामास्क फिरत आहेत. तरीही मनपाच्या पथकाने दिवसभरात केवळ ९१ नागरिकांवरच कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
