🕒 1 min read
जालना : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या जाफ्राबाद तालुक्यातील तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका डेटिंग साइटवर झालेल्या ओळखीचे वादात पर्यवसान झाल्याने आरोपीने त्याचा पाषाण-सूस रस्त्यावरील खिंडीत खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सुदर्शन बाबूराव पंडित असे खून झालेल्या तीस वर्षीय आरोपीचे नाव आहे.
सुदर्शन पंडित हा मुळचा जाफ्राबाद तालुक्यातील जानेफळ येथील रहिवाशी होता. शिक्षणासाठी तो पुण्यातील सुतारवाडी भागात पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. काही दिवसांपूर्वी एका डेटिंग साइटच्या माध्यमातून आरोपी आणि सुदर्शन यांची ओळख झाली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले. आरोपीने शनिवारी रात्री सुदर्शनला सूस खिंडीत बोलावले आणि तिथे त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून केला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी सुदर्शनच्या खोलीमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याची देखील चौकशी केली तेव्हा सुदर्शन अनेकदा रात्री अभ्यास करण्यासाठी बाहेर जात असल्याचे त्याच्या सहकाऱ्याने सांगितले. त्यामुळे घटनेच्या दिवशी देखील तो अभ्यास करण्यासाठी बाहेर गेला असेल, असे आम्हाला वाटल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिस सर्व बाजुंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
