अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सीरिजची चौथी आणि अखेरची टेस्टही याच मैदानात खेळवली जाणार आहे, त्यामुळे या मॅचसाठीचं पिच कसं असेल, याबाबत कयास बांधले जात आहेत.
अशातच टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामवर रोहित शर्माने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रोहित मैदानात झोपलेला दिसत आहे. चौथ्या टेस्टसाठीची खेळपट्टी कशी असेल, याचा विचार करतोय, असं कॅप्शन रोहितने या फोटोला दिलं आहे.
https://www.instagram.com/p/CL1iahkBR6M/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी


