नांदेड : जिल्ह्यात शासकीय नर्सिंग कॉलेजला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मुंबई येथील शासकीय अतिथीगृह सह्याद्री येथे ही बैठक पार पडली.
नांदेड हे शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर आहे. तसेच शीख धर्माचे पवित्र स्थान असल्याने येथे पर्यटकांची रेलचेल आसते. यामुळे येथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असतो. यामुळे येथे परिचारीकांची गरज वाढत चालली आहे. ही गरज लक्षात घेऊन नांदेड येथे शासकीय नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेड येथे मंजूर झालेले हे महाविद्यालय राज्य सरकारचे महाराष्ट्रातील पाचवे शासकीय महाविद्यालय आहे. नवे महाविद्यालय सुरू करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. नवे महाविद्यालय लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
या निर्णयानुसार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० प्रवेश क्षमतेचा बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सोबतच या महाविद्यालयांसाठी आवश्यक पदनिर्मिती, यंत्रसामग्री, फर्निचर, वाहन, पुस्तके आणि दैनंदिन आवर्ती खर्चासाठी १६ कोटी ९ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. राज्यात सद्यःस्थितीत एकूण ११६ नर्सिंग कॉलेज आहेत. यात केंद्र सरकारची दोन, तर राज्य सरकारची चार शासकीय महाविद्यालये आहेत. सध्या रुग्णालयात १८२ जागा रिक्त आहे. शिवाय या क्षेत्रात भवितव्य असून रोजगार मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत करतो असे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. यादव चव्हाण यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये कोरोनाचे २५६ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू; ७१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- मराठा आरक्षणावर ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करावा : खासदार उदयनराजे भोसले
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- …तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
