🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १ मार्च २०२१) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला. आणखी २८ दिवसांनंतर ते लसचा दुसरा डोस घेतली. पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कोरोनाची लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.
‘AIIMS हॉस्पिटलमध्ये COVID-19 लस घेतली आहे. आपले डॉक्टर आणि शास्त्रांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईत कमी वेळेत महत्त्वाचे काम केले आहे. जी लोकं कोरोना लस घेण्यासाठी योग्य आहे, त्यांनी लस टोचून घ्यावी, आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त करायचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली.
देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याल सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
