🕒 1 min read
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती.
येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. यामुळेच, अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. यानुसार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गब्रू चा राजीनामा. महाराष्ट्राच्या जनतेची जराही चाड असेल तर आता तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना अटक करा.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 28, 2021
दरम्यान, भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी यावर भाष्य केले आहे. ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला आहे, असं भातखळकर यांनी म्हटलंय.
‘महाराष्ट्राच्या जनतेची जराही चाड असेल, तर आता तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना अटक करा’, अशी मागणी भातखळकर यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करा’
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
