पुणे : संजय राठोड यांच्याविरोधात गेले अनेक दिवस भाजपचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार घेत सरकारवर सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
‘पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचे फोटो आणि ऑडिओ क्लिपही आहेत. पण तरीही कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही हे आश्चर्य आहे. ज्या महाराष्ट्र पोलिसांचं नाव संपूर्ण देशात घेतलं जातं त्या पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधीच पाहिली नव्हती’, असं फडणवीस म्हणाले.
तसेच त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करण्याची मागणी केली आहे. पुरावे असतानाही कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्याला नोकरीवर राहण्याचा काहीच अधिकार नाही नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी शक्ती कायद्यावारुनही सरकारवर टीकास्त्र डागले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत’, असं म्हणत सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
