मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्या विरोधात गेले अनेक दिवस भाजपचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्या वारंवार करत आहेत.
अखेर आज संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाने घाणेरडं राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे, यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे राठोड म्हणाले.
राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करा’
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- काँग्रेस कमिटीचे सदस्य थेट पोहोचले कोविड सेंटरमध्ये आणि..
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
