Share

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप

Published On: 

बीड : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिच्या भावास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून नांदगाव येथील शशिकांत बालासाहेब चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश माहेश्वरी पटवारी यांनी हा निकाल दिला.

मिळालेल्या माहितीनूसार, अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शशिकांत चव्हाण याने शेतात नेवून अत्याचार केला. याबाब कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या लहान भावाला जिवे मारील अशी धमकी देत पिडीत मुलीवर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलीस ठाण्यात शशिकांत चव्हाण याच्याविरूद्ध पोक्सो कायद्यातर्गंत गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणाचा पोलीस तपास बर्दापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केला. व आरोपी विरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आले. सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी आरोपीविरूद्धचे सबळ पुरावे सादर केले. या प्रक्रियेत सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले.

आरोपी विरूद्धचे ठोस पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शशिकांत बालासाहेब चव्हाण यास दोषी ठरवून जन्मठेप व ३१ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, आरोपीना करण्यात आलेला ३१ हजार रुपयांचा दंड हा पीडीत मुलीस देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला. शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने ही इतर मदत पिडीतेस देण्यात यावी. अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!