औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मागील चार दिवसांत किलेअर्क येथील पालिकेचे कोविड केअर सेंटर हाऊसफुल झाले आहे. याठिकाणी शुक्रवारी कंत्राटदाराकडून जेवण पुरविण्यास प्रचंड विलंब झाला. यावेळी सर्व पॉझिटिव्ह रुग्ण थेट रस्त्यावर आले. दरम्यान पालिकेच्या कर्मचार्यांनी सर्व रुग्णांची समजूत घालत त्यांना शांत केले. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.२७) काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी किलेअर्क कोविड सेंटरला भेट देत दाखल झालेल्या रूग्णांची भेट घेतली. तसेच त्यांना खाद्यपदार्थ व पाणी वाटप करण्यात आले.
औरंगाबाद काँग्रसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशम उस्मानी यांनी काँग्रेसच्या टीमसमवेत केंद्राला भेट दिली व तेथील डॉक्टर व कर्मचार्यांकडून झालेल्या घटनेची माहिती घेतली. तेथे दाखल असलेल्या रूग्णांना होणाऱ्या अडचणींबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून दोषींच्या कारभाराची चौकशीची करुन त्वरित कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री तथा औरंगाबादचे संपर्क मंत्री अमित देशमुख यांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनीही घटनेबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी कोरोना सेंटर मधील विविध समस्या काँग्रेस समोर मांडल्या. यात मुख्यत्वे पाण्याची कमतरता, जेवण वेळेवर भेटत नाही, साफसफाई योग्य होत नाही व इतर समस्या सांगितल्या.
महत्वाच्या बातम्या
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- वेगवेगळ्या घटनेत मारहाण
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
- धक्कादायक! न्यायालयात अर्ज देण्यासाठी आलेल्या व्यक्तिचा आत्महत्येचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
