Share

धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले

Published On: 

बीड : गेवराई शहरापासून जवळच असलेल्या दोन वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी शनिवारी भरदिवसा दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैठण फाट्यावरून गेवराईकडे येत असताना सराफ व्यापारी चंद्रकांत उदावंत यांच्या बॅगमधील ५० ग्रॅम सोने चोरट्यांनी दुचाकीवरून येत बॅग हिसकावून घेत लुटले. यात ५ लाखांचा ऐवज होता. तर गेवराई शहरातील हॉटेल डिसेंटजवळ कापूस व्यापारी हरिभाऊ गुट्टे (रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांच्याकडे कापसाची १० लाखांची रक्कम बॅगमध्ये होती.

ही रक्कम या चोरट्यांनी धूम स्टाइल चोरी करत लांबवल्याने खळबळ उडाली. दोन्ही घटना दुपारी १ ते २ वाजेदरम्यान घडल्या. भरदिवसा गेवराईत दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटण्यात आल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!