मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
मात्र, संजय राठोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून अद्यापही ते पदावर कायम आहेत. राठोड यांनी २३ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे जाऊन संत सेवालाल महाराज व देवीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संबंधी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. यात शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाले होते.
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं सूचक तितकंच रोखठोक ट्विट राऊत यांनी केलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची गच्छंती होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2021
छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असं लिहिलेला महाराजांचा फोटो, राऊत यांनी ट्विट केलं आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्या वतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या
- दुधाच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ, पण ग्राहकांचे नुकसान नाही तर शेतकऱ्यांना फायदा
- आदित्य ठाकरेंकडून युकेतील अधिकारी गिरवणार मराठीचे धडे
- कोरोनामुळे शाळा बंद , विद्यार्थीनींच्या हक्काचा ‘रुपयाही’ शासनाने नाकारला
- ‘एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण डिप्रेशनमध्ये जाईल’ ; विराटच्या ‘त्या’ नैराश्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
- आता गाठा अवघ्या चार तासात पुणे; मध्य रेल्वेचे पथक उद्या शहरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

