🕒 1 min read
सिंधुदुर्ग : अहमदाबादमध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं.
भारत विरुद्ध इंग्लंड या संघांमधील तिसरा कसोटी सामना या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. याच वेळी या स्टेडियमचं उदघाटन व नामांतर करण्यात आलं. या नामांतरावरुन सर्वच स्तरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव या स्टेडियमचं असल्याचं सांगत विरोधी पक्षांनी भाजपवर निशाणा साधला होता. मात्र, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे आरोप खोदून काढत स्पष्टीकरण दिलं होतं.
‘या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं नावं सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह असं आहे. संकुलातील क्रिकेट स्टेडियमला फक्त पंतप्रधान मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे.’ असा खुलासा करण्यात आला होता. दरम्यान, तरीदेखील भाजपला लक्ष्य केलं जात आहे. खासकरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं २३ जानेवारी रोजी उदघाटन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, काही स्थानिकांचा या पुतळ्याला विरोध असल्याचं बोललं जात होतं.
दक्षिण मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याला स्थानिकांचा विरोध होता. गुजरातमध्ये स्टेडियमला पंतप्रधान मोदींजीचं नाव देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही पण बाळासाहेबांचा पुतळा आणि स्मारकाला मुंबईकरांचा विरोध असताना सुद्धा शिवसेनेने ते जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 26, 2021
हाच धागा पकडून निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘दक्षिण मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याला स्थानिकांचा विरोध होता. गुजरातमध्ये स्टेडियमला पंतप्रधान मोदींजीचं नाव देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही पण बाळासाहेबांचा पुतळा आणि स्मारकाला मुंबईकरांचा विरोध असताना सुद्धा शिवसेनेने ते जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारलं.’ अशी टीका करत निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंमत असेल तर अमेय खोपकरना अटक करून दाखवाच; मनसेचं आव्हान
- ‘राजसाहेब शिवजयंतीला शुभेच्छा द्यायला विसरले, परंतु सावरकरांना मात्र आवर्जून अभिवादन केले’
- मोदी-शहांच्या सोयीसाठी ‘टप्प्यात कार्यक्रम’ ठरवला का?, ममतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
- प्रतिष्ठा पणाला…पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; आठ टप्प्यांत होणार निवडणूक
- मोठी बातमी : राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
