मुंबई : साधारणतः फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या एप्रिल-मे मध्ये घेण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी, राज्य बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा मार्च-एप्रिल महिन्यात होणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर परीक्षांच्या संभाव्य तारखा देखील जाहीर केल्या होत्या.
दिनांक २२/०२/२०२१ पर्यंत मंडळाने शिक्षक, पालक, विद्यार्थी व संघटनांकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचना प्राप्त झाल्यानंतर आता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितलं आहे.
दहावी-बारावीच्या अंतिम तारखा –
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १० वी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये अनुक्रमे २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ आणि २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी – http://mahahsscboard.in/

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द नाहीच – वर्षा गायकवाड
दहावी, बारावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंमत असेल तर अमेय खोपकरना अटक करून दाखवाच; मनसेचं आव्हान
- ‘राजसाहेब शिवजयंतीला शुभेच्छा द्यायला विसरले, परंतु सावरकरांना मात्र आवर्जून अभिवादन केले’
- मोदी-शहांच्या सोयीसाठी ‘टप्प्यात कार्यक्रम’ ठरवला का?, ममतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
- प्रतिष्ठा पणाला…पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; आठ टप्प्यांत होणार निवडणूक
- कोरोनाला हददपार करण्यासाठी शनिवार आणि रविवार ‘या’ शहरात पाळला जाणार बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

