Share

ऋतिक रोशन हाजीर हो ; मुंबई क्राईम ब्रांचचं ऋतिकला समन्स

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. येत्या शनिवारी ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे हा समन्स बजावण्यात आला आहे.

ऋतिक रोशनने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिकच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत हे चांगले मित्र होते. मात्र , नंतर त्यांच्यात वाद झाल्या नंतर कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावेळी आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता.

यानंतर ऋतिकने त्याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडेही तक्रार केली होती. हे सर्व प्रकरण 2016 चं आहे. ही केस आता सायबर सेलकडून सीआययुकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता ऋतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ऋतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!