Share

जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा : मंत्री संजय बनसोडे

Published On: 

🕒 1 min read

लातूर :  जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व बाबींची चौकशी करून सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले असल्याची माहिती बनसोडे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना दिली आहे.

जळकोट तालुका हा डोंगरी दरी कपारीत पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे.  एकूण 47 गावे व वाडी तांडा अशी वस्ती आहे. एक हंगाम खरिपाचा डोंगरी व मजुरा चा तालुका म्हणून याची ओळख संपुर्ण महाराष्ट्राभरात आहे. जळकोट तालुक्यातील घोंशी सर्कल मधील गुप्ती आतनूर, गव्हाण, मर सांगवी डोंगरगाव, डोंगर कोनाळी, शिवाजीनगर तांडा, शेलदरा उमरदरा, केकत सिंदगी, काटेवाडी, रावणकोळा हळद वाढवणे हे अनेक गावे व पंधरा ते वीस तांडे पर्वतरांगेत डोंगरात दरी कपारीमध्ये वसलेले आहेत.

नैसर्गिक हा तालुका डोंगरीच आहे. मात्र याकडे अद्याप कोणत्याही सरकारने लक्ष दिले नाही. त्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा दिला तर, या तालुक्यातील गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात आरक्षण देखील मिळेल तसेच  नोकरीत आरक्षण मिळेल, वयोमर्यादेत आरक्षण मिळेल तसेच गरीबांचे मुलं शिक्षण घेऊन नोकरीला लागतील. व्यवसायासाठी या डोंगरी तालुक्याचा दर्जा चा फायदा देखील होईल. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नक्कीच होईल. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी या तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा अशी विनंती देखील मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेटून बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या वेळी केली आहे. जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा एक खास बाब म्हणून मिळवून देणारच असेही राज्यमंत्री बनसोडे यांनी या वेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!