🕒 1 min read
जालना : पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा गैरकृत्य करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास तिच्या घरी पाणी घेऊन जात असताना आरोपीने तिला रस्त्यात गाठले. यानंतर त्याने मुलीसोबत गैरकृत्य करत छेडछाड केली. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिच्या नाना कांबळे असे आरोपीचे नाव असून तो शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी आहे.
पीडित मुलगी, घटनास्थळी असलेली आई, घटना पाहणारे साक्षीदार, पंच अंमलदार बी. आर. पाटील यांच्या साक्षी आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश स. गो. देशमुख यांनी आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये भारताने इंग्लंडला चारली धूळ !
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- मोठी बातमी : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीमुळे खळबळ
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
- जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा : मंत्री संजय बनसोडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
