Share

‘फक्त दोन दिवसातच मॅच संपली हे टेस्ट क्रिकेटच आहे का’? टीम इंडियाचा विजयावर युवराजची टीका

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद  : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.

या कसोटीत फिरकीपटूंचा बोलबाला दिसून आला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ वर सर्वबाद झाल्यावर भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, कालच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताला एका मागे एक धक्के बसत गेले. १४५ धावांमध्ये भारताचा संघ बाद झाला. यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच षटकात अक्षर पटेलने दोन बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

यानंतर, आर. अश्विन च्या जोडीने अक्षरने इंग्लंडला सुरुंगच लावला. अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला. यानंतर, इंग्लंडने भारताला दिलेलं ४९ धावांचं लक्ष्य अगदी सहजपणे गाठलं. बिनबाद ४९ धावा करत भारताने ही कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. दुसऱ्या दिवशीचं तिसरं सत्र सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा विजय मिळवला.

पण टीम इंडियाच्या या विजयानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दोनच दिवसांमध्ये ही टेस्ट मॅच संपली. दुसऱ्या दिवशी तर तब्बल 17 विकेट पडल्या. यानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंनी खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. फक्त इंग्लिश खेळाडूच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने या खेळपट्टीवर टीका केली आहे.

‘फक्त दोन दिवसातच मॅच संपली. हे टेस्ट क्रिकेट आहे का नाही ते माहिती नाही. जर अनिल कुंबळे आणि हरभजनला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या, तर त्यांच्या एक हजार आणि 800 विकेट असत्या. विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. अक्षर पटेलची शानदार बॉलिंग. अश्विन आणि इशांत शर्मालाही शुभेच्छा,’ असं ट्विट युवराज सिंगने केलं.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!