Share

जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज

Published On: 

🕒 1 min read

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरुवारी जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील ५३ रुग्णांसह सावरगाव १, कडवंची १, नेर १, पिंपळवाडी १, पीरकल्याण १, विरेगाव १, घनसावंगी तालुक्यातील चितेवडगाव १, अंबड ५, बदनापूर १, मात्रेवाडी १, भाकरवाडी १, जाफराबाद १, बोरी १, निवडुंगा १, येवता १, टेंभुर्णी १, वडाळा १, भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी ३, चिंचोली १, बुलडाणा ४, औरंगाबाद २ , नागपूर १ अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे ७४, तर अँटिजनमधून ११ अशा एकूण ८५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात ७५५ अॅक्टिव्ह रुग्ण
जालना जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १३ हजार ८३७ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर ३८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७५५ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत सध्या ८४७ अहवाल प्रलंबित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!