🕒 1 min read
मुंबई : भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ रस्त्याकडेला ही गाडी उभी करण्यात आली होती. हे अज्ञात वाहन संशयास्पदरित्या लावण्यात आले होते.
फक्त मुकेश अंबानी यांचे घरच नाही तर या परिसरात अनेक बड्या व्यक्तींचे असलेली घरे, सामान्य मुंबईकरांची रेलचेल, अगदी काही मिनिटांवर असलेलं महालक्ष्मी, हाजीअली हे धार्मिक स्थळ, मंत्र्यांची घरे यामुळे या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. वेळीच, मुंबई पोलीस, बॉम्बशोधक पथक, अंबानी यांच्यासाठी तैनात असलेली सुरक्षा व्यवस्था यांच्या सतर्कतेमुळे हे विघ्न वेळीच टळलं आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल. pic.twitter.com/ORyj3pL1CS
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 25, 2021
या गाडीमध्ये तब्बल २० जिलेटीन काड्यांचा साठा होता, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी हा साठा जप्त करून गाडी देखील ताब्यात घेतली आहे. दरम्यान ज्या गाडी मध्ये हे स्फोटके भरलेले आहेत त्या गाडीचा नंबर आणि मुकेश अंबानीच्या गाडीचा नंबर हा एकच असलेला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही गाडी घातपातासाठीच्या हेतूनेच या ठिकाणी लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून वेळीच पोलिसांनी कार्यवाही केली आणि मुंबईवरचं संकट टळलं !
महत्त्वाच्या बातम्या
- कौतुक तर होणारच…! अक्षर पटेलच्या फिरकीची जादू एकाच कसोटीत घेतले ११ बळी
- सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये भारताने इंग्लंडला चारली धूळ !
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- मोठी बातमी : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीमुळे खळबळ
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
