🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच राजकीय बाबतीत चर्चेत असतात. परंतु राहुल गांधी आता खासगी कारणावरून चर्चेत आले आहेत. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये दिसत आहेत.
राहुल गांधी यांचा समुद्रात पोहण्याची मजा घेत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनोखा अंदाज चर्चा सध्या रंगत आहेत. केरळातल्या कोल्लममध्ये राहुल गांधी मच्छिमारांसोबत मासे कसे पकडतात हे पाहण्यासाठी समुद्रात गेले होते. मच्छिमार जाळं टाकून मासे पकडत होते त्यावेळी त्यांनी खोल समुद्रात उडी घेतली हे पाहून राहुल गांधींनीही समुद्रात उडी घेत चक्क मच्छिमारांसोबत १० मिनिटं पोहण्याचा आनंद लुटला.
राहुल गांधी हे मच्छिमाऱ्यांच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घण्यासाठी समुद्रात उडी मारली. यावेळी त्यांनी काही क्षण मच्छिमारांसोबत घालवत मासेमारी बद्दल चर्चा सुद्धा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी मच्छीमारांसह त्यांच्या बोटीत बसले आणि समुद्रात गेले. त्यांनी बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वाडी तट किनाऱ्यावरूम प्रवास सुरू केला आणि सुमारे एक तास समुद्रात होते.
#WATCH| Kerala: Congress leader Rahul Gandhi took a dip in the sea with fishermen in Kollam (24.02.2021)
(Source: Congress office) pic.twitter.com/OovjQ4MSSM
— ANI (@ANI) February 25, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रंग बदलणार नाही’, तेंडुलकरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य
- आखेर नायगाव येथील दारुबंदीला मिळाला हिरवा कंदिल
- 45 वर्षांवरील नागरिकांना 1 मार्चपासून लस मिळवण्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम
- मराठा आरक्षणाचा लढा तीव्र; ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाची तयारी सुरू
- लातूर पोलिसांकडून बुलेटचा आवाज चिरडला; धडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
