🕒 1 min read
औरंगाबाद : वाढत्या चोऱ्यांच्या घटना आणि त्यांच्यावर कारवाई करता करता पोलिसांच्या नाकी नउ आले आहे. त्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी कडक केली आहे. वाहनांची तपासणी कसून करण्यात येत असताना. दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणाNया तरुणाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान सिडको बसस्थानकासमोर पकडले.
देवराव लक्ष्मण थोरात (वय ३२, रा. भोयगाव, ता. फुलंब्री) असे ताब्यातील आरोपीचे नाव आहे. शहरात वाहन चोरीच्या घटनांमुळे पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली जात आहे. सिडको बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती.
त्यावेळी एन-१ सिडको येथून देवराव थोरात हा दुचाकीवर (एमएच-२०-डीएन-४२१३) येत होता. त्याला पोलिसांनी अडवले. त्याच्या दुचाकीवरील क्रमांकाची पोलिसांनी पडताळणी केली असता तो क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात थोरात विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
