Share

‘इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर, गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’

Published On: 

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार त्यांनी केला आहे. त्या काल नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली आहे. ‘५२ लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास’ असल्याचे सुळे यांनी म्हंटलय. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेत भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

‘इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर, गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’, अशी मागणी करतानाच याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार’, आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला घाबरू नका. कुणी गुंडगिरी करत असल्यास रात्री अपरात्री कधीही मला फोन करा. केवळ इथलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा मला ओळखतात. म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही’, असे विधान गणेश नाईक यांनी तुर्भे येथे एका कार्यक्रमात केले होते. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!