Share

कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या मुलायम सिंहांच्या सूनेने दिली 11 लाखांची देणगी

Published On: 

🕒 1 min read

लखनौ- ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे. राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे.

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. संघ आणि भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे. कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेले माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी या मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

अपर्णा यादव यांनी माध्यमांना सांगितले की,’राम मंदिर हा आमच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी आम्ही अयोध्येतील राम मंदिरासाठी स्वच्छेनं 11 लाख रुपये दिले आहेत. राम हा देशाचं चरित्र, संस्कार आणि सर्व प्रकारच्या आस्थेचं केंद्र आहे. हे देशाचं मंदिर आहे. प्रत्येकानं या मंदिरासाठी दान द्यायला हवं, असं मला वाटतं. याच भावनेतून मी देखील दान दिले आहेत.

‘दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी बाबत केलेल्या विधानावर टीका करताना समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला होता. देणग्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्यांना काय म्हणायचे? असा प्रश्न त्यांनी लोकसभा सभागृहातील उपस्थितांना विचारला. तसेच ते चंदाजीवी संघटनेचे सदस्य नाहीत का? असा खोचक टोलाही त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!