Share

दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

हिंगोली : वसमत तालुक्यातील वाई येथील दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाह झालेल्या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक मुलगी औंढा नागनाथ तालुक्यातील सिरला येथे, तर दुसरी मुलगी पूर्णा तालुक्यातील गणफूर येथे देण्यात आली आहे.

वसमत तालुक्यातील वाई येथील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह थाटामाटात पार पडला. मात्र, त्या अल्पवयीन असल्याची तक्रार जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीसोबत त्या मुलींचा प्रवेश निर्गम उतारा तसेच लग्नाचे छायाचित्रदेखील सोबत जोडले होते. दरम्यान, बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाई येथील ग्रामसेवकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामसेवक सिद्धार्थ मुळे यांनी चौकशी केली. मुलींचे शाळेतील प्रवेश निर्गमदेखील तपासले. यामध्ये दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

दरम्यान, . या प्रकरणी पोलिसांनी औंढा नागनाथ तालुक्यातील सिरला येथील नवरदेव ज्ञानेश्‍वर अण्णासाहेब कुऱ्हे आणि अण्णासाहेब नारायण कुऱ्हे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आङे. तर गुणपूर येथील दुसरा नवरदेव पंजाब रणजित काळबांडेंसह रणजित बाबाराव काळबांडे नवनाथ नामदेव मगर, सदानंद नामदेव मगर, विवाह लावणारा सुधाकर ठाकर याच्यासह इतर 4 जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!