Share

ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

जालना: ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. जाफराबाद तालुक्यातील विजयी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

जाफ्राबाद तालुक्यातील १७ ग्रामपंचायती पैकी १३ ग्रामपंचायतीत सरपंच आणि १७ ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच झाले. जनतेनी आपल्यावर विश्वास दाखविला. त्या विश्वासाला तडा न जाऊ देता सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करा. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी गावातील विकास कामे करताना सर्वच घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेने पारदर्शक कारभार करावा, असा सल्ला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना दिला.

गावाच्या विकासासाठी निधी कसा उभा करायचा यासाठी आमदार संतोष दानवे आणि आपण सर्वच प्रशिक्षण शिबिर घेऊन तोडगा काढू, असे दानवे म्हणाले. यावेळी प्राचार्य सुरेश दिवटे, उध्दव दुनगहू, मधुकर गाढे, विजय परिहार, शेषराव कळंबे, गोविंदराव पंडीत, संतोष लोखंडे, शालीकराम म्हस्के, दगडूबा गोरे, राजु चव्हाण, दिपक वाकडे, दत्तू पंडीत, आदींची उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!