हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पाण्याच्या टाकीत सापडलेल्या दोन सांगाड्यांची हाडे फ्रॅक्चर असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणी 8 वर्षांनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, १४ नोव्हेंबर २०१२ रोजी कुरुंदा येथील वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू पाण्याच्या टाकीत गेल्यानंतर काही मुले टाकीवर गेली. टाकीत दोन मानवी सांगाडे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये गावातील २५ वर्षीय युवक साईनाथ इंगोले बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपासात एक सांगडा साईनाथ इंगोले यांचा असल्याचे स्पष्ट झालं होत, तर दुसरा सांगडा हा एका मिहिलेचा महिलेचा असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही सांगाड्याची काही हाडे फ्रॅक्चर असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालावरून कुरुंदा पोलिसांनी आज तक्रार दाखल केली. यामध्ये साईनाथ इंगोले आणि एका महिलेला मारहाण करून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह न वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे नमूद केले. मृत साईनाथ यांच्या कवटीला व फासळीला फ्रॅक्चर झाले तर महिलेच्या खांद्यावर मारून त्यांचे हाड फ्रॅक्चर केल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणात अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपअधीक्षक वसीम हाश्मी, सहायक पोलिस निरीक्षक गोपीनवार तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली – नाना पटोले
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
- आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण
- ‘काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला’
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

