Share

“…तर राज्यात पेट्रोलचे दर ७५ रुपये लीटर होईल”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात टाळेबंदी करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.दिवसेंदिवस देशात इंधनाचे दर वाढत असूनसततच्या दरवाढीमुळे पेट्रोल शंभरीकडे वेगाने जात आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजप याच मुद्द्यावरून कॉंग्रेसवर जोरदार टीका करत होता मात्र आता सत्तेत आल्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा खरच फायदा करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य असल्याचं आता अधोरेखित होऊ लागले आहे. गेल्या वर्षाअखेरीस दरांत काहीशी घट झाली होती. मात्र जानेवारीपासून भडका वाढतच आहेत.

यातच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी असा दावा  केला आहे. पेट्रोलचे भाव वाढले त्याला राज्य शासन जबाबदार आहे. राज्य शासन सर्वाधिक पन्नास टक्के कर आकारत आहे. जर हे कर कमी केले तर राज्यात पेट्रोलचे दर ७५ रुपये लीटर होईल.

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वसईत भेट दिली. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या विविध मुद्‌यांवर राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकार सर्वाधिक कर आकारत आहे.

त्यांनी कर कमी केल्यास पेट्रोल ७५ रुपयांनी मिळेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निवडणुकीतील पराजयाला घाबरत असल्याने त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!