Share

‘प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा’ ; आरोग्य मंत्री टोपे यांचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. कोरोना रुग्ण आढळल्यास प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा, असे आदेशच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवा आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा, असे निर्देश टोपे यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन ‘एसएमएस’ चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून तशी माहितीही दिली आहे.‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’ अशा आशयाचे ट्विट करून राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!