Share

‘ज्यांचे नगरसेवक मोजायला हाताची बोटं पुरेशी आहेत, अशांनी महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करणे हास्यास्पद’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे महानगपालिका बरखास्त करा अशी, मागणी करणाऱ्या शिवसेनेचा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेनेची मागणी हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटलंय.

‘पुणे महानगरपालिका बरखास्त करा’, अशी अत्यंत हास्यास्पद मागणी पुणे शहर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पुणेकरांनी ज्यांना सातत्याने नाकारले आहे, ज्यांचे नगरसेवक मोजायला हाताची बोटं पुरेशी आहेत, अशांनी महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करणे, यापेक्षा दुसरा विनोद तो काय?’ असे म्हणत मोहोळ यांनी पुणे शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

काय आहे पुणे शिवसेनेची मागणी ?

शहराचा विकास आराखडा जानेवारी २०१७ मध्ये मान्य झाला असतानाही ६ मीटरचे ३३५ रस्ते मीटरचे ९ मीटर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केलाय. बहुमताच्या जोरावर ठराविक बांधकाम व्यावसायिकांसाठी सर्वसामान्य पुणेकर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम सत्ताधारी करताहेत.

शासनाला अंधारात ठेऊन मोठ्या प्रमाणावर शहर विकासाऐवजी सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा हा प्रस्ताव नियमबाह्य करुन, पुणेकरांची तसेच शासनाची फसवणूक केली म्हणूनच पुणे महानगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलीये.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!