Share

शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा

Published On: 

🕒 1 min read

बीड : येथे काका-पुतण्यांच्या राजकारणाचा खेळ सुरूच आहे. शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्यातून विस्तवही जात नाहीये. राज्य पातळीवर दोन्ही पक्षांचे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र, बीडमध्ये दोन्ही पक्षांचे अजिबात पटत नसल्याचे दिसतेय. संदिप क्षीरसागर समर्थक नगरपालिकेतील काकू-नाना विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करावी अशी पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केली आहे. याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पाचही नगरसेवकांना नोटीस काढली आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आगामी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुतणे अामदार संदीप क्षीरसागर यांच्याकडील नगरसेवक प्रभाकर पोपळे, रंजित बन्सोडे, सीता मोरे, कांताबाई तांदळे आणि अश्विनी गुंजाळ या पाच नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देत पुतणे अामदार संदीप यांना चांगलाच हादरा दिला होता.

यानंतर आता काकू-नाना विकास आघाडीचे सचिव तथा बीड नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी जगताप यांच्याकडे शिवसेनेत प्रवेश केलेल्या त्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना जिल्हाधिकारी जगताप यांनी पाच नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या असून येत्या २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी हाेणार आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार या नगरसेवकांवर काय कारवाई होणारॽ याकडे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!