Share

बनावट मतदानकार्ड बनविणाऱ्याला न्यायालयाने दिला जामीन

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : बनावट मतदानकार्ड बनविणाNया दोघांचा गेल्या आठवड्यात निवडणूक विभागाने आणि पुंडलिकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत पर्दाफाश केला होता. अटकेत असलेल्या दोघांपैकी महा-ई-सेवा वेंâद्राचा नोकर नवनाथ भक्तदास शिंदे (वय २६, रा. योगेश्वरी नगर, गारखेडा परिसर) याला १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.वाडकर यांनी जामीन दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभगाचे तहसीलदार शंकर लाड व पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात १० पेâब्रुवारी रोजी रात्री संयुक्त कारवाई करीत मातोश्री डिजीटल या दुकानाचा मालक हरिश धुराजी वाघमारे (वय २२, रा. गजानन कॉलनी, गारखेडा परिसर) व महा-ई-सेवा वेंâद्राचा नोकर नवनाथ शिंदे यांना बनावट मतदानकार्ड तयार करून वितरीत करतांना अटक केली होती.

दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, नवनाथ श्ािंदे याने जामीनासाठी अ‍ॅड.शिरीन वारे यांच्या मार्पâत अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असता न्या.ए.एस.वाडकर यांनी १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅड.शिरीन वारे यांना अ‍ॅड. संजय घागरे यांनी सहकार्य केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!