Share

‘महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहतात आणि नंतर सांगतात…’; अबू आझमींची मुक्ताफळे

Published On: 

🕒 1 min read

भिवंडी- राज्यात संध्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. एका मंत्र्यासोबत या प्रकरणाचे धागेदोरे आढळून आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते महेबूब शेख यांचे नाव देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याने राज्यातील महिला सत्ताधारी नेत्यांपासून सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान,महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात आवाज बुलंद होत असताना महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी करत महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे.

‘पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये” अशी मागणी देखील अबू आझमी यांनी केली.

देशात कायदा चुकीचा आहे. कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशनमध्ये. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय तर, महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आणि वर्षभरानंतर सांगतात माझा बलात्कार झाला,’ अशी टिप्पणी अबू आझमी यांनी केली आहे.

“इस्लामी कायदा आहे. एखाद्या महिलेचं जर लग्न झालं नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येतं, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे. खरं तर प्रत्येक धर्मात हेच आहे. मात्र आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!