Share

लग्नाला जाणाऱ्या क्रूझरला ट्रकची भीषण धडक, तिघांचा जागेवरच मृत्यू, 7 गंभीर जखमी

Published On: 

कन्नड : शहरात लग्नाला जाणाऱ्या एका क्रूझर वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत. कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ क्रूझर आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की, तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघाताच्या वेळी मोठ्या आवाजामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने गर्दी हटवून जखमींना रुग्णालयात नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले, असून ते रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

लग्नाला जाणाऱ्या कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन सदस्यांच्या मृत्यूमुळे लग्नाचा आनंद क्षणार्धात दुःखात बदलला. जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. या अपघातामागील दोन वाहने कशी धडकली याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही वाहने भरधाव वेगात होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षदर्शींकडे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!