Share

आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या ऑक्शनसाठी नियमावली जारी…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी आपल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वृत्तानुसार आयपीएल (IPL) 2021 साठी मिनी लिलाव पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक परदेशी खेळाडू सहभागी होतील. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.

https://www.instagram.com/p/CLMPMpbFtIl/?utm_source=ig_web_copy_link

त्यांनतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्थानिक मैदानावर आयपीएल आयोजनाचे प्रयत्न केले जातील. असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. कोरोनामुळे आयपीएल २०२० यूएईत झाले होते. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिकेचे भारतात आयोजन होणार असल्याने आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला आहे. सर्व संघांना खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख २० जानेवारी देण्यात आली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात (ट्रेडिंग विंडो) जाता येणार आहे. बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना कायम ठेवले आहे तर काहीना संघातून काढण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CLKIiDRlq1Z/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या हंगामासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. चेन्नईत गुरुवारी हे ऑक्शन होणार आहे. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती, परंतु ८ फ्रंचायझींनी यापैकी २९२ नावांची अंतिम यादी BCCIकडे सोपवली. ऑक्शनला सामोरे जाताना फ्रँचायझींना सहा नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, अन्यथा त्यांना भुर्दंड सहन करावा लागू शकतो…

https://www.instagram.com/p/CKi3mo2lLiJ/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएल ऑक्शनसाठी सर्व फ्रँयाचझीच्या संबंधित व्यक्ती चेन्नईत एक दिवस आधीच पोहोचले आहेत. त्यांची कोरोना चाचणी होईल त्याचबरोबर १४व्या हंगामासाठी होणाऱ्या ऑक्शनसाठी नियामवली जारी करण्यात आली आहे.
नियम १ : कोणत्याही फ्रँचाझीला त्यांच्या पर्समध्ये उपलब्ध असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक बोली लावता येणार नाही.
नियम २ : BCCI आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या नियमानुसार सर्व फ्रँचायझींना त्यांच्या एकूण रक्कमेतील ७५ टक्के रक्कम ही खेळाडूंवर खर्च करावी लागले. असं करण्यात कोणती फ्रँचायझी अपयशी ठरल्यास त्यांची उर्वरित रक्कम जप्त केली जाईल
नियम ३ : यंदा मेगा ऑक्शन होणार नाही. त्यामुळे RTM म्हणजेच राईट टू मॅच कार्ड वापरता येणार नाही.
नियम ५: कॅप आणि अनकॅप अशी मिळून भारतीय खेळाडूंची संख्या कमीतकमी १७ आणि जास्तीत जास्त २५ होऊ शकते.
नियम ६: आयपीएलच्या एका संघात ८ हून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू असायला हवेत. असे नियम जारी कारण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!