🕒 1 min read
चेन्नई : यजमान भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला 134 धावांवर गुंडाळत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर, टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या आणि मिळालेल्या 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते.
मात्र, टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
स्टोक्सकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि 51 चेंडू खेळत फक्त 8 धावा केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या डावात अश्विनच्या फिरकीच्या अडकलेला स्टोक्सला दुसऱ्या डावातही अश्विननेच पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. यानंतर, अक्षरने पोपला बाद करत इंग्लंडला सहा धक्का दिला होता. अशाप्रकारे, पाहुण्या संघाला टीम इंडियाने धूळ चारली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं’
- वादग्रस्त प्रायव्ह्सी पॉलिसीनंतर व्हॉट्सऍपचे भन्नाट फिचर येणार
- संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- राम मंदिरासाठी देणग्या न देणाऱ्यांची नावे आरएसएस गोळा करत आहे ?
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
