🕒 1 min read
मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे.
या सर्व आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, विरोधी पक्ष भाजप कडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे. पूजा चव्हाणची हत्त्या झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘मंत्री संजय राठोडची हकालपट्टी नव्हे अटक व्हायला हवी. पूजा चव्हाणने स्वतः जीव दिला नाही. तिची हत्त्या झाली आहे. त्यासाठी ठाकरे सरकारचे मंत्री जबाबदार आहेत’, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं’
- वादग्रस्त प्रायव्ह्सी पॉलिसीनंतर व्हॉट्सऍपचे भन्नाट फिचर येणार
- संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- राम मंदिरासाठी देणग्या न देणाऱ्यांची नावे आरएसएस गोळा करत आहे ?
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
