Share

व्हॅलेंटाइन डे ला आत्महत्या केलेल्या अनोळखी तरुणाचा मृत्यु

Published On: 

औरंगाबाद : १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी शहरात शिवशंकर कॉलनीत एका २२ वर्षीय तरुणाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर त्याला रुग्णालायात दाखल केले होते. पण सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अद्याप या तरुणाची ओळख पटली नाही.

शिवशंकर कॉलनी येथे रविवारी मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुण सायली हॉटेलच्या मागे आला. मागे गल्लीत तो आल्यानंतर काही वेळ तिथेच फिरला. थोड्या कालावधीनंतर त्याने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील रसायन टाकून घेतले. आणि स्वत:ला आग लावून घेतली. आग लावल्यानंतर भडका उडाल्याने तो ओरडू लागला. त्यामुळे परिसरातील नागरिक तेथे जमा झाले.

नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणाच्या उजव्या हातावर अश्विनी तर डाव्या हातावर आकाश असे गोंदलेले होते. तसेच बदामही गोंदलेले होते. आत्महत्येचे कारण अजुनही स्पष्ट झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या माहितीप्रमाणे मृत तरुण त्या भागातील रहिवासी नाव्हता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!