🕒 1 min read
चेन्नई : दुसरा दिवस हा भारतीय संघाच्या पारड्यात पडला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३४ धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती भक्कम झाली आहे. फिरकीपटू आर. अश्विनने चार विकेट्स मिळवल्या. तर, अक्सर पटेलने ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पहिला बळी घेतला. यासोबतच इशांत शर्माने देखील २ बळी मिळवत महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. क्रिकेटमध्ये नेहमीच पाहिला जात की, प्रत्येक क्रिकेटपटूची कोणत्या-ना-कोणत्या क्रिकेटपटूसोबत तुलना केली जाते.
अशातच भारतीय संघात देखील असेच काहीसे पाहायला मिळाले. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर यष्टीरक्षणाची धुरा भारतीय संघात रिषभ पंतने हाती घेतली होती. परंतु अशा वेळीसुद्धा रिषभच्या खेळीची तुलना धोनी आणि वृद्धीमान साहा यांच्यासोबत होत असते. या सर्वांवर उजेड पाडत आर अश्विन याने तुलना करणाऱ्यांना धारेवर धरले आहे.
अनुभवी फिरकीपटू अश्विनने रविवारी रिषभची बाजू घेऊन त्याची तुलना इतरांशी करण्याऐवजी त्याच्या सामर्थ्यानुसार खेळण्याची त्याला संधी देण्यात यावी असे सांगितले. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर अश्विन म्हणाला की, ‘पंतची तुलना सतत धोनीशी केली जाते आणि आता त्याच्या यष्टीरक्षणाची तुलना साहासोबत केली जात आहे. बऱ्याच वेळा अशा तुलना थांबवण्याची आवश्यकता असते, तेव्हाच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.’
पुढे तो म्हणतो की, ‘रिषभ चांगली फलंदाजी करत आहे. सोबतच आपल्या यष्टीरक्षणावर देखील खूपच मेहनत घेत आहे. बऱ्याच वेळा तुमची तुलना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसोबत केली जाते आणि हे तुमच्यासाठी फार अवघड असू शकत. रिषभकडे चांगली क्षमता आहे म्हणून तो आज इथवर पोहचू शकला आणि मला यात काडीमात्र शंका नाही की तो आपली कामगिरी आणखी चोख बजावेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- महाविद्यालयीन निवडणुका ; नेतृत्वोदय, संघटना व राजकारण
- ‘…म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?’
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- पँगाँगमधून सैन्य माघारी, हे केंद्र सरकारने चीनसमोर घातलेलं लोटांगण; काँग्रेसची जहरी टीका
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
