🕒 1 min read
मुंबई : जवळपास वर्षभर होत आलेल्या कोरोनाच्या काळात घरो घरी असलेल्या बच्चे कंपनी, शालेय विद्यार्थी यांचा दैनिक मैदानी खेळ, बागेत फेर फटका आणि रविवार किंवा जोडून आलेल्या सुट्टीत राणी बाग, मत्स्यालय, म्हतारीचा बूट, कमला नेहरू पार्क, वरळीचे तारांगण, दादर- गिरगाव चौपाटी, भाऊचा धक्का, गेटवे ऑफ इंडिया आणि घारापूरी लेणी आदी पाहण्याचा योग हरवूनच बसलेला आहे. यात सर्वात जास्त प्रायोरिटी शालेय विद्यार्थी आणि बच्चे कंपनीला असेल तर ती भायखळा येथील राणीबागेतील वाघोबा आणि पेंग्विन भेट दर्शनाची.
राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उद्यापासून पुन्हा खुले होणार असून शक्ती आणि करिश्मा वाघ यावेळी राणीबागेतील खास आकर्षण असणार आहेत. उद्यापासून राणीबागेत अस्वल, तरस, कोल्हे, बिबट्या यांचेही दर्शन मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पण, पर्यटकांना यासाठी नियमावली पाळावी लागणार आहे.
१२ तारखेला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालयातून पट्टेरी वाघांच्या एका जोडीचे आगमन झाले आहे. दाखल झालेल्या या वाघांच्या जोडीमध्ये ६ वर्षे वय असलेल्या एका वाघिणीचा समावेश असून तिचे नाव ‘करिश्मा’ असे आहे. तसेच या जोडीमध्ये असणाऱ्या वाघाचे नाव ‘शक्ती’ असे असून त्याचे वय ४ वर्षे आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून या जोडीच्या बदल्यात दोन जोडी ‘चितळ’ आणि दोन जोड्या ‘चित्रबलाक’ सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाविद्यालयीन निवडणुका ; नेतृत्वोदय, संघटना व राजकारण
- ‘…म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?’
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- ‘मोदींना “ते” दिसतं पण अडीच महिने शेतकरी हक्कांसाठी आंदोलन करतायत ते दिसलं नाही’
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
