Share

आईला फोन केल्यामुळे फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Published On: 

औरंगाबाद : पोलिसांना थाप मारून फरार झालेल्या कैद्याने आईला फोन केला आणि पोलिसांना कैद्याला अटक केलीये. अमर भाऊसाहेब गायकवाड असे या २१ वर्षीय कैद्याचे नाव आहे. हात दुखत असल्याची थाप मारून एका हातातील हातकडी दुसऱ्या हातात घालत असताना अमर पोलिसाला धक्का देऊन पळाला होता. मात्र, २४ तासांच्या आत मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला मनमाडहून ताब्यात घेतले आहे.

बुधवारी दुपारी अमरने पोलिसांना थाप मारून पोलिस व्हॅनमधून पळ काढला होता. गुरुवारी दुपारी तो रेल्वेने मनमाडकडे निघाला. दरम्यान, त्याने एका प्रवाशाच्या मोबाइलवरून आईला फोन केला. मात्र, त्याचवेळी अमरच्या आई पोलिस ठाण्यातच बसलेलेल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ मनमाड रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. अमर रेल्वेतून उतरताच मनमाड रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अमरची बहीण मनमाडला राहते. तो तिच्याकडे जाणार होता. ही माहिती समजल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलिस नाईक बाबासाहेब कांबळे, विलास मुठे, संतोष भानुसे, श्याम आढे आणि सोमकांत भालेराव यांचे पथक मनमाडला रवाना झाले. त्यानंतर या पथकाने अमर गायकवाडा रेल्वे पोलिसांकडून ताब्यात घेतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!