पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या 13 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
“गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या राजमातांचा पुतळा देवस्थानाच्या वतीने उभारण्यात आलेला आहे. देवस्थान कमिटी कायमच राजमातांच्या क्रांतीकारी विचाराचा वसा घेऊन चालत आहे. चौथऱ्यासह सुमारे 20 फूट उंचीचा पुतळा देवस्थानामार्फत उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध परवानग्या घेऊन लोकनेते शरद पवार यांच्याहस्ते अनावरण होणार” असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- “वाल्मीची पुनर्रचना करून व्यवस्थापन जलसंपदा विभागाकडे द्यावे”
- खिशातील बिड्यांच्या ‘क्लू’मुळे पोलिसांना सापडला मारेकरी
- जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
