Share

ऑरिक सिटीचा ७५०० हजार एकर जमिनीचा प्रकल्प सज्ज; आताउद्योगाची प्रतीक्षा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : डीएमआयसी अंतर्गत औरंगाबाद येथील भव्यउद्योग नगरी ऑरिक सिटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शेंद्रा एमआयडीसीतील २५०० एकर जागा ही पाणी, रस्ते, वीज व इतर सुविधांनी सुसज्ज आहे. तर बीडकीन येथील ७५०० एकर जागेवरील पायाभूत सुविधांचे कामही मार्चआखेर पर्यंत पूर्ण होईल. यानंतर येथील प्लॉट उद्योगांना विक्रीस उपलब्ध होतील. अशी माहिती औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमीटेड(एआयएलटी) चे महाव्यवस्थापक संजय काटकर यांनी दिली आहे. बिडकीन एमआयडीसीतील कामांची पाहणी केल्यानंतर संजय काटकर बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी ऑरिक सिटीचे प्रत्यक्षात काम सुरू झाले. पण कोरोना संसर्गानतंर ‘लॉकडाऊननंतर ऑरिकमध्ये ‘मिशन बिगिनिंग’ सुरू झाले. ३ जूनपासून डीएमआयसीतील कामे पुन्हा सुरू झाली होती. शेंद्रा आणि बिडकीन एमआयडीसीत सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी काटकर यांनी प्रत्यक्ष बिडकीन येथे भेट देऊन काम पाहणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली आणि काही मार्गदर्शक सूचना दिल्या.

ऑरिक सिटी या प्रकल्पातील २५ हजार एकरपैकी १० हजार एकर जमीन शेंद्रा आणि बिडकीनमध्ये संपादित करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम एआयएलटी ही कंपनी राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून पाहत आहे. शेंद्रा परिसरात आतापर्यंत छोट्या-मोठ्या ६० कंपन्या सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १७०० एकर जमीनचे अधिग्रहण सुरू झाले आहे अशी माहिती एआयएलटीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!