Share

प्लॅस्टिक कचरा विल्हेवाटप्रकरणी पतंजलीसह कोक, पेप्सी, बिसलेरीला कोट्यवधींचा दंड !

Published On: 

नवी दिल्ली: कचऱ्यापासून निर्माण होणारे प्रदूषण ही एक मोठी समस्या देशाला भेडसावत असताना अनेक कंपन्यांकडून देखील अनेकदा कधीही नष्ट न होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावताना हलगर्जीपणा केला जातो. यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कडून पतंजलीसह कोक, पेप्सी, बिसलेरी या शीतपेय उत्पादक कंपन्यांना प्लॅस्टिक कचरा संकलन आणि विल्हेवाटीची माहिती सरकारी यंत्रणांना न दिल्याबद्दल कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे.

यामध्ये ‘बिसलेरी’ला 10.75 कोटी रुपये, तर पेप्सिको इंडिया होल्डिंग कंपनीला 8.7 कोटी रुपये आणि हिंदुस्थान कोका कोला शीतपेय कंपनीला 50.66 कोटी रुपये दंड सीपीसीबीने ठोठावला आहे. या सर्व कंपन्यांनी पुढील 15 दिवसांत दंड भरावयाचा असून, उल्लंघन केलेल्या सरकारी नियमांची पूर्तता करावयाची आहे. आपल्या उत्पादनांची विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) ही उत्पादक कंपन्यांनी सांभाळायची असते. एकदा तयार केलेले डिस्पोजेबल उत्पादन पुन्हा ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही, ही उत्पादक कंपनीची जबाबदारी आहे.

बिस्लेरीला 21,500 टन प्लॅस्टिकसाठी प्रतिदिन 5000 रुपये दंड ठोठावल आहे. पेप्सी कंपनीला 11 हजार 194 टन प्लॅस्टिक कचर्‍यासाठी सीपीसीबीने जबाबदार धरले आहे. सीपीसीबीच्या म्हणण्यानुसार कोक कंपनीने जानेवारी ते सप्टेंबर 2020 या कालावधीत 4,417.78 टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला. मात्र, कोक कंपनीला 1,05,744 टन प्लॅस्टिक कचरा विल्हेवाटीचे टार्गेट (ईपीआर) दिले होते.

प्लॅस्टिक कचरा विल्हेवाटप्रकरणी पतंजली शीतपेय कंपनीला सीपीसीबीने एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर नरीष्को बीव्हरेजेस कंपनीला 85.9 लाखांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, आम्ही सीपीसीबीचे नोटीस तपासत असून, त्याला योग्य उत्तर देऊ, असे कोक आणि पेप्सी या दोन्ही कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आम्हाला सीपीसीबीची नोटीस मिळाली आहे. संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून हा प्रश्न आम्ही निर्धारित वेळेत सोडवू, अशी प्रतिक्रिया या प्रवक्त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!