Share

अरुण गवळीला जेलमध्ये कोरोनाची लागण

Published On: 

नागपूर:- नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी पाच जणांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातीलच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गवळीला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण दिसत होती. यानंतर त्याची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. डॅडींसोबत इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे. अरुण गवळी हे सध्या नागपूर कारागृहात कैद आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!